Thu. Feb 25th, 2021

देवरांवर टीका करणाऱ्या निरूपमांना भाई जगताप यांचं प्रत्युत्तर!

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे. देवरांवर टीका करणाऱ्या संजय निरुपम यांना भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात, अशा शब्दांत त्यांनी निरुपम यांच्यावर निशाणा साधला.

संजय निरूपम यांची टीका

काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू  आहे.

मिलिंद देवरा यांनीही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर मुंबईतील पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी देवरांवर Tweet मधून निशाणा साधला.

राजीनाम्यातून त्यागाची भावना अंतःप्रेरणेतून येते. इथे दुसऱ्या क्षणी राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की वरच्या पदावर जाण्याची शिडी? अशा ‘कर्मठ’ लोकांपासून पक्षानं सावध राहायला हवं, अशी टीका निरुपम यांनी देवरांवर केली होती.

टीकेला प्रत्युत्तर!

या टीकेला देवरांऐवजी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात.

पण तेच जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात.

ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात.

इतकं सगळं करूनही तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात.

अशा ‘कर्मठ’ नेत्यांपासून सावध राहायला हवं, असं ट्विट करत जगताप यांनी निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *