Tue. Mar 2nd, 2021

काँग्रेसच्या नाराज अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत.याद्या जाहीर झाल्यानंतर नाराजांच्या इतर पक्षांसोबत भेटीगाठी सुरू आहेत. औरंगाबादमधील काँग्रेसचे अब्दुल सत्तार देखील नाराज असून त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.यावेळी गिरीश महाजनही याठिकाणी हजर होते.सत्तार यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेसुद्धा त्यांनी जाहीर केले आहे. निवडणूक लढण्यासाठी मतदारांची मते जाणून घेण्याकरीता आमखास मैदानात एक सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान सत्तार भाजपात प्रवेश करणार का ? भाजपकडून  सत्तारांना काही ऑफर आहे का? असे प्रश्न उपस्थित  केले जात आहेत.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

औरंगाबादमधून अब्दुल सत्तार  निवडणूक लढवण्यास ईच्छुक होते मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसनं औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज आहेत.

मला विश्वासात न घेताच औरंगाबादची उमेदवारी दिल्याचा सत्तारांनी दावा केला आहे.

आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

मला औरंगाबादमध्ये निवडणूक लढवणे योग्या वाटत असून राजीनाम्यानंतर  मला निवडणूक लढविण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.

दरम्यान सत्तार भाजपात प्रवेश करणार का ? भाजपकडून  सत्तारांना काही ऑफर आहे का? असे प्रश्न उपस्थित  केले जात आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *