काँग्रेसकडून मोदी सरकारच्या निर्णयाला आक्षेप

प्रजासत्ताक दिनापूर्वी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमधील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित झाली आहे. त्यामुळे सुमारे ५० वर्षांपासून प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योतीचे आता राष्ट्रीय युद्ध स्मारका विलीनीकरण झाले आहे. मात्र, मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीनीकरणाच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. ‘आपल्या शूर सैनिकांसाठी जळत असलेली अमर ज्योत आज विझणार आहे, ही अत्यंत खेददायक बाब असल्याचे’, राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांनी ट्विट केले की, ‘काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत पुन्हा पेटवू.’ असे ट्विट करत केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयावर राहुल गांधींनी आक्षेप नोंदविला आहे.
बहुत दुख की बात है कि हमारे वीर जवानों के लिए जो अमर ज्योति जलती थी, उसे आज बुझा दिया जाएगा।
कुछ लोग देशप्रेम व बलिदान नहीं समझ सकते- कोई बात नहीं…
हम अपने सैनिकों के लिए अमर जवान ज्योति एक बार फिर जलाएँगे!— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2022