गोव्यामध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा!

गोव्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. गोव्यात भाजप सरकार अल्पमतात असून हे सरकार बरखास्त करावं, आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे राज्यपालांकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवलेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.
तसंच गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करू नये. तसं झाल्यास ते बोकायदेशीर ठरेल. या गोष्टीला काँग्रेस पक्ष त्याला आव्हान देईल असंही पत्रात म्हटलं आहे.
पक्षीय बलाबल
एकूण विधानसभा सीट – 40
मॅजिक फिगर – 21
बीजेपी – 14
काँग्रेस – 16
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष – 3
गोवा फॉरवर्ड पक्ष – 3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -1
अपक्ष – 3
भाजप आणि मित्रपक्ष – 24
काय आहे काँग्रेसचा दावा?
भाजपचे मित्र पक्ष आता त्यांच्या सोबत नाहीये. पर्रीकर सरकार अल्पमतात आहे आणि काँग्रेसकडे सरकार स्थापन करण्यासाठी 21 पेक्षा जास्त संख्या आहे. वेळ आल्यास सभागृहात आपलं संख्याबळ इतर पक्षाच्या मदतीनं ते सिद्ध करू शकतील.