Mon. Sep 27th, 2021

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि bjp चे खा. डॉ. सुजय विखे विमानात एकत्र!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास योगायोगानेएकाच विमानाने केला. त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक आहे.

तसंच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

तर खा. सुजय विखे- पाटील आपल्या नियोजित कामांसाठी दिल्लीकडे रवाना झाले.

सोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघे शेजारीशेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. काहींनी त्यांचे फोटोही काढले.

थोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती.

दोघांनी संपूर्ण प्रवास शेजारी बसूनच झाला की नाही, या प्रवासात दोघांत राजकीय चर्चा झाली की अन्य मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान झाले, याची माहिती मात्र समजू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *