Wed. Dec 1st, 2021

तेजप्रताप यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकारास मारहाण

तेजप्रताप यादव यांचे सुरक्षारक्षक आणि पत्रकारांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला आहे. तेजप्रताप यादव मतदान करून बाहेर येत असताना ही घटना घडली आहे. पत्रकारांनी यादव यांच्या गाडीची काच फोडल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तेजप्रताप यादव यांनी पोलीसात तक्रार दिली आहे.लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात 59 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे

नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये माजी मंत्री असलेेले आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांचे सुरक्षारक्षक आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची झाली.

तेजप्रताप यांनी मतदान केल्यानंतर ते परत निघाले असताना हा प्रकार घडला.

तेजप्रताप यादव मतदान करून जात असताना त्यांच्या गाडीखाली कॅमेरामनचा पाय आला.

यामुळे त्याने हातातील कॅमेरा त्याने यादव यांच्या गाडीवर फेकला आणि गाडीची काच फेकली.

यानंतर त्यांचे अंगरक्षक आणि तेथील उपस्थित पत्रकारांमध्ये वाद झाला.

तेजपाल यादव यांचे ट्वीट

मतदान करून बाहेर पडत असताना माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला.

या हल्ल्यात माझ्या गाडीचे नुकसान झाले असून अंगरक्षक देखील गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच, याप्रकरणी तेजप्रताप यांच्याकडून पोलीसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *