Sun. Apr 5th, 2020

शरद पवार यांच्या हत्येचा कट?

शरद पवार यांच्या हत्येचा कट केला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विषयी ‘पोस्टमन’ (postman) या पोर्टल वर अश्लील शब्दांत टीका करत जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्या आहेत. त्यात ‘शरद पवारांना गोळ्या घाला’ असे शब्द वापरण्यात आले आहेत.

या विषयी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय म्हणाले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक?-

अनेक दिवस शरद पवारांबद्दल (Sharad pawar) कुजबुज मोहीम चालवली जात आहे.

भाजपचं सरकार घालवून महाविकास आघाडीच सरकार आणल्यामुळे भाजपची चिल्लीपिल्ली सतत परवारांच्या विरोधात गरळ ओकत असतात.

या प्रकरणी सखोल तपास झाला पाहिजे

गृहमंत्री अनिल देशमुख हे लवकरात लवकर कारवाई करतील, असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *