Wed. Dec 8th, 2021

तुमच्या नेत्यांनाही लगाम घाला – रोहित पवार

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन मोठ्या प्रमाणावर संताप पाहायला मिळाला. शिवप्रेमींनी व्यक्त केलेल्या संतापानंतर भाजपने हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची घोषणा सोमवारी रात्री केली.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी याबाबत ट्विट करुन पुस्तक मागे घेण्याची घोषणा केली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रकाश जावडेकरांचं ट्विट रिट्विट केलं आहे. यासर्व प्रकरणावरुन रोहित पवारांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं हे चांगल केलं. परंतु हा वाद संपल्याचं असं म्हणण्याऐवजी तो निर्माण करायलाच नको होता, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.

तुमचे नेते हे लोकभावनेला न जुमानता, पक्षातील वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील, तर त्यांना लगाम घालण्याचा सल्ला रोहित पवारांनी प्रकाश जावडेकरांना दिला आहे.

तसेच नेत्याच्या गुडबूकमध्ये जाण्यासाठी थोर व्यक्तींशी तुलना करण्याऐवजी अन्य मार्ग शोधण्याचा सल्ला देखील रोहित पवारांनी दिला.

अधिक वाचा : Video : ‘पुन्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल बोलाल तर…’, छ. उदयनराजेंचा इशारा

दरम्यान शिवाजी महाराजांचे वंशंज उद्यन राजेंनी या वादग्रस्त पुस्तकाबाबत आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

अधिक वाचा : ‘होय शरद पवार म्हणजेच जाणता राजा…’ जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *