कोरोनाच्या भीतीने चिकनकडे ग्राहकांची पाठ

कोरोना विषाणू जीवावर उठला आहे. कोरोनामुळे केवळ लोकांचे जीवच जात नाहीत, तर या विषाणूमुळे उद्योग क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे.
चिकन खालल्याने कोरोना विषाणूचा पादुर्भाव होतो, अशा अफवा मोठ्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
या अफवांमुळे आणि कोरोना व्हायरसमुळे कुक्कुट व्यावसायिकावंर, पोल्ट्री फॉर्म चालकांवर तसेच या संबंधित सर्वावंर संकट आलं आहे.
कोरोनामुळे चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. याचा परिणाम थेट चिकनच्या दरांवर झाला आहे.
शेतकरी चक्क १० रुपयाला विकत आहेत. तरीही ग्राहक वर्ग कोंबडी खरेदी करायला तयार नाहीत.
यामुळे चिकन उत्पादक शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी कर्ज घेतले आहेत.
पण उत्पादन विक्री करायच्या वेळेस अशाप्रकारे अफवा पसरल्या आहेत. यामुळे 10 रुपयाला कोंबड्या घ्यायला कोणताही ग्राहक तयार नाही. त्यामुळे चिकन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आला आहे.
अनेक शेतकरी या अफवांमुळे त्रस्त आहेत. सरकारने तत्काळ चिकन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.