Mon. Aug 15th, 2022

कोरोनाचा फटका आयपीएल स्पर्धेला ?

कोरोना विषाणूने जगभरात हैदोस मांडला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत काही हजारोंमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे. या कोरोनाचा फटका अनेक उद्योग क्षेत्रांनाही बसला आहे.

यानंतर आता कोरोनाचा फटका आयपीएल क्रिकेट स्पर्धेला बसण्याची शक्यता आहे. या कोरोनामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला येत्या २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण कोरोनामुळे या स्पर्धेची तारीख पुढे ढकलता येऊ शकते.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले राजेश टोपे ?

कोरोनामुळे अनेक मोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी यासारख्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते.

आयपीएल स्पर्धा नंतर देखील घेतल्या तरी चालेल. खबरदारी म्हणून आयपीएल स्पर्धा पुढं ढकलण्या बाबतचा वितचार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान सिने क्षेत्रातील आयफा सिने अवॉर्ड इंदूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण कोरोनामुळे हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.