Jaimaharashtra news

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक

मुंबई: कोथिंबीर हा प्रत्येक भाजींमध्ये टाकल्या जातो. कोथिंबीरमुळे भाजीला विशिष्ट चव येते. तसेच कोथींबीरचा वापर हा अनेक पदार्थात करतात. आरोग्य चांगलं राखण्यात कोथिंबीर हे फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. कोथिंबीरीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. कोथिंबीर ताज्या ताकात टाकून पिल्यानं मळमळ, अतिसार ,अपचन, आणि आतड्याला आलेली सूजपासून बचाव करता येतो. तसेच टायफाइड झाल्यास कोथिंबर खाल्यानं फायदा होतो. कोरडे धणे पाण्यात उकळून पाणी गाळून थंड करावं. ते पाणी पिल्यानं कॉलेस्ट्रालची लेव्हल कमी करता येते. कोथिंबीरीचा एक चमचा ज्यूसमध्ये थोडी हळद टाकून मुरूमांवर लावल्यास ते बरे होतात. तसेच कोथिंबीर, हिरवी मिर्ची, किसलेलं खोबरं आणि आलं घालून चटणी खाल्लास अपचनामुळं होणारी पोटदुखीत आराम मिळतो. मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होत असल्यास सहा ग्राम धणे अर्धा लीटर पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात साखर मिसळून ते गरम पाणी प्या… फायदा होईल. तसेच अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धणे टाकून पिल्यानं पोटदुखी बसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोथिंबीरीचा वापर हा फायदेशीर ठरते.

Exit mobile version