राज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित

राज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३ हजार ५८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. ०८ टक्के इतके झाले आहे. तसेच दिवसभरात ८६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.
राज्यात सध्या ४७ हजार ९२६ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबईत मंगळवारी ३५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४०४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २४ हजार ८९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर मुंबईत मंगळवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के झाला आहे. सध्या मुंबईत ३ हजार ७१८ सक्रिय रुग्ण आहेत, तर रुग्ण दुपटीचा दर १ हजार २६६ दिवसांवर गेला आहे.