Fri. Mar 5th, 2021

Corona मुळे संत्री उत्पादक शेतकऱ्यांना मात्र ‘अच्छे दिन’!

एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य आणि व्यापारी चिंताग्रस्त आहेत. बाजारपेठा ठप्प आहेत. मात्र दुसरीकडे विदर्भातील संत्री उत्पादक शेतकरी मात्र आनंदी आहेत. याचं कारण म्हणजे जगभरात संत्राला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा संत्री उत्पादक प्रदेश म्हणजे वरुड मोर्शी तालुका. देशात सर्वात जास्त संत्री याच भागात उत्पादित होतात.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या संत्र्याची चव ही आंबट गोड असते.

संत्र्याला भारतासह विदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्याच दुसरं कारण म्हणजे संत्र्यांमध्ये ‘क जीवनसत्व’ आहे. या जीवनसत्वामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगांना दूर ठेवण्यात मदत होते. त्यामुळे कोरूनाच्या पार्श्वभूमीवर संत्र्यांना जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड येथून बांगलादेश, दुबई, टांझानिया या देशांत संत्री एक्सपोर्ट होतात. यामुळे संत्री उत्पादक शेतकरी सध्या आनंदी आहेत. आठवडाभरापूर्वीपर्यंत संत्र्यांना केवळ 12 हजार रुपये टनांचे भाव होते. आज ते भाव 25 ते 30 हजारावर गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *