Thu. Dec 2nd, 2021

Corona : शरद पवारांचा जनतेशी संवाद

देशात कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. यामुळे देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी जनतेला कोरोनाची लागण न होण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलं. तसंच कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करण्याचा आवाहनही जनतेला केलं. तसेच यावेळेस त्यांनी अनेक क्षेत्रातील गोष्टींवर सूचना केल्या.

https://bit.ly/2UzvZtc

काय म्हणाले शरद पवार ?

 • पहिल्या वर्षी व्याजात पूर्ण सुट हवी.
 • मोफत धान्याचा स्वागत करतो. पण त्याचा शेती अर्थव्यावस्थेवरील परिणामाचा सरकार नं विचार करावा.
 • मजूर, लहान व्यावसायिकांकडे लक्ष दिलं पाहिजे.
 • आपातकालीन व्यवस्थेत काम करणार्यांना ईनसेंटिव्ह प्रोत्साहन दिल पाहिजे.
 • महापूर , दुष्काळ पाहिला अनेक संकटं पाहिली महाराष्ट्रानं मात्र आजच संकंट गंभीर, दिर्घकालीन परिणाम करणारं.
 • सूचनांच पालन करणं गरजेचं आहे.
 • मी घरातच आहे. दूरध्वनी वरून संपर्कात आहे.
 • सूचना दुर्लक्ष केले तर परिणाम सहन कराव लागेल.
 • प्रत्येक सूचनेच तंतोतंत पालन करण गरजेचं.
 • नागरिकांनी गर्दी टाळावी.
 • धान्य मोफत देणार ही चांगली बाब.
 • लोकांशी संपर्क टाळा.
 • पशुपक्ष्यांवरही कोरोनाचा परिणाम.
 • सरकारच्या सूचनाचं पालन करावं
 • शेतक-यांबाबत सरकारनं विचार करावा.
 • कर्जाची परतफेड करणं शक्य नाही.
 • कोरोनाशी लढण्यासाठी सर्वानी एकत्रित यावं.
 • -सरकार आणि आरबीआय़च्या निर्णय़ाचं स्वागत.

दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार आपल्या एका महिन्याचा पगार दिला जाणार आहे. याबाबतची माहिती शरद पवारांनी आपल्या ट्विटरवरुन दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *