कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका – अजित पवार

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर न पडण्याचं आवाहन करुन देखील लोकं ऐकायला तयार नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, असं थेट इशाराच आता उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याबाबतीत उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. ह्यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही.आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका,कृपया घरीच रहा,अशी विनंती करतो.
मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शंभरीच्या पार गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत रुग्णांचा आकडा हा १०१ इतका झाला आहे. तर राज्यातील मृतांचा आकडा हा ४वर पोहचला आहे.
#Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जनतेशी साधणार संवाद
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.