Wed. Mar 3rd, 2021

corona effect : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशाभरात जनता कर्फ्युचं आवाहन करण्यात आलं आहे. हे जनता कर्फ्यु सुरु असतानाच रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

आजपासून भारतात ३१ मार्चपर्यंत रेल्वेसेवा लॉकडाऊन करण्यात आली आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत चालणार नाही. या निर्णयात मालगाड्यांना मात्र वगळण्यात आलं आहे.

ज्या ज्या लोकांनी आधीच ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं आहे, त्यांना तिकीटाची रक्कम परत केली जाणार आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत रविवारी १०ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही आता ७४ वर पोहचली आहे. तर राज्यातील मृतांचा आकडा हा २वर पोहचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *