Fact Check : खरंच लोकांची गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावर सिंह सोडलाय ?

कोरोनामुळे जगभरात थैमान घातलंय. भारतात लोकांना आवाहन करुनदेखील रस्त्यावरची गर्दी ओसरताना दिसत नाहीये. दरम्यान काही तासांपासून रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी सिंह सोडण्यात आलं असल्याचा मेसेज व्हायरल होतोय.
असा आहे व्हायरल मेसेज
रशियाच्या जनतेला घरात राहण्याचं आवाहन अध्यक्ष व्लादिमर पुतिन यांनी केलंय. हे आवाहन लोकं पालत नाहीयेत. यामुळे या आवाहनाची कडेकोटकपणे अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर 800 वाघ सोडले आहे.
यामेसेजची सत्यता आम्ही पडताळून पाहिली आहे.
फॅक्ट चॅक
या व्हायरल मेसेजची सत्यता पडळण्यात आली. यानंतर असं समजलं की व्हायरल होत असलेला फोटो ४ वर्षांपूर्वीचा असल्याचं समजलं आहे. त्यामुळे हा फोटो आताचा नसल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेला फोटो हा 2016 साली डेली मेल यामध्ये प्रसिद्ध झाला होता.
हा मेसेज फेक असल्याचं निष्पन्न झालं आहे. पण जर का भारतात यशस्वीपणे जमावबंदी करायची असेल तर, खरंच रस्त्यावर सिंह सोडायला हवेत, असं काही नेटीझन्सचं म्हणंन आहे.
दरम्यान जनतेने कोणताही फेक मेसेज व्हायरल न करण्याची तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे जनतेला घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे. रविवारी जनता कर्फ्युच्यावेळी संध्याकाळी ५वाजता घरातून थाळीनाद करुन आपातकालीन सेवा देणाऱ्यांचे आभार मानायचे होते. मात्र काही अतिउत्साही लोकांनी घरातून बाहेर पडत या कर्फ्युचं उल्लंघन केलं.
#Corona : संचारबंदी लागू करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांना विनंती
तसेच काही लोकं सरकारच्या आवाहनाला हवं तसा प्रतिसाद देत नाहीत. सोमवारीदेखील या परिस्थितीत वाढ झाली. एमईपीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता राज्यात संचारबंदी लागू करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.