Sat. Mar 6th, 2021

Corona | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 225वर

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात नुकतेच कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या 5 रुग्णांमध्ये मुंबई, पुणे आणि बुलडाण्यातील रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतून 1 तर पुणे आणि बुलडाण्यातून प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आले आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा आता 225 इतका झाला आहे. तसेच कोरोनामुळे राज्यातील मृतांचा आकडा हा दुहेरी झाला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात मृतांचा आकडा 10वर पोहचला आहे. कोराना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा राज्य आरोग्य विभागाकडू देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *