Corona : एमपीएससीची पूर्व परीक्षा ‘या’ तारखेला होणार, आयोगाकडून नवी तारीख

राज्य लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षेच्या ( Mpsc Pre Exam 2020 ) नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने यासंदर्भात प्रसिद्धपत्रक काढलं आहे.
आयोगाकडून राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब वर्गाच्या संयुक्त परीक्षा घेतली जाणार आहे.
सुधारित तारखेनुसार राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता २६ एप्रिल २०२०ला घेण्यात येणार आहे. तर याआधीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ५ एप्रिलला घेण्यात येणार असल्याचं आयोगाकडून निश्चित केलं होतं.
तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब वर्गाची संयुक्त परीक्षा ही १०मे ला पार पडणार आहे. याआधी ही परीक्षा ३मे ला घेण्यात येणार होती.
परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी ही आपल्या मुळगावी परतले आहेत. याआधी आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखांमुळे विद्यार्थी वर्गात नाराजी होती. पण सुधारित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीकोनातून सरावाला वेळ मिळणार आहे.
अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन अनेक विद्यार्थी हे आपलं गाव सोडून पुण्यात पोहचतात. आयोगाची मुख्य परीक्षा देण्याआधी पूर्वपरीक्षा द्यावी लागते.
दरम्यान ९ वी ते ११वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोनाचा पादुर्भाव होता तरी, १० वीच्या परीक्षा सुरु होत्या. पण १०वीचा शेवटचा पेपरही ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तो पेपर केव्हा घेतला जाणार, याबाबतचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येणार, असं शिक्षणंमंत्र्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं होतं.
सद्यपरिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. रविवारी २२ मार्चला पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला जनतेने उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
तसेच संध्याकाळी ५ वाजता जनतेनी थाळीनाद केला. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यां प्रति आम्ही कृतज्ञ आहोत, या थाळीनाद करण्यामागचा हा उद्देश होता.
दरम्यान हा जनता कर्फ्यु रविवारी सकाळी ७ ते रात्री ते ९ पर्यंत होता. पण हा जनता कर्फ्युनंतर सोमवारी सकाळी ५ पर्यंत वाढवण्यात आला. जनतेने या कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिला.