Corona : रविवारी मुंबई मेट्रो-मोनो सेवा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे जनतेला घरी बसण्याचं आवाहन केलं जात आहे. रेल्वे-बसमधील प्रवाशी संख्येत घट होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी २२ मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. याच जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मोनो आणि मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे.
रविवारी २२ मार्चला मेट्रो-१ आणि मोनो सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती मेट्रो प्रशासनाने ट्विटद्वारे दिली आहे.
जनता कर्फ्यूच्या आवाहनला बद्दल देशातील जनता सकारत्मक आहे. जनता कर्फ्युमुळे इंडिगो आणि गोएअरने १००० पेक्षा अनेक उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच एक्सप्रेस गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच बस आणि रेल्वे सेवा देखील अंशत:हा प्रभावित असणार आहेत.