Thu. Dec 2nd, 2021

Corona : कोरोनामुळे वृत्तपत्र वितरण बंद, संघटनेचा निर्णय

मुंबईत कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी घरपोच वृत्तपत्रसेवा ही अखंडपणे सुरुच असते. मात्र आता कोरोनामुळे वृत्तपत्र संघटनेने वृत्तपत्र वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा फटका अनेक क्षेत्राला बसला आहे.

राज्यात काही दिवसांपासून अनेक सेवा बंद ठेवण्यात आल्या. मात्र घरपोच वृत्तपत्र सेवा अखंडपणे सुरु होती. पण आता कोरोनाची धास्ती वृत्तपत्र विक्रेता संघटनांनेदेखील वृत्तपत्र न विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जनतेला घरी वृत्तपत्राशिवाय रहावं लागणार आहे.

वृत्तपत्र विक्रेता संघटनांनेदेखील आजपासून 23 मार्च वृत्तपत्र न विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वृत्तपत्र विक्रेता संघटनेने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती आटोक्यात येत नाही, तो पर्यंत वृत्तपत्र सेवा खंडित राहणार असल्याची माहिती या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

काय म्हटलंय प्रसिद्धीपत्रकात ?

वृत्तपत्र वितरण करण्यामध्ये विक्रेते, डेपोधारक, वृत्तपत्राचे पदाधिकारी, घरपोच वृत्तपत्र टाकणाऱ्या मुलांचा सहभाग असतो.

वरील सर्व घटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत वृत्तपत्र वितरण थांबवत आहोत.

वृत्तपत्र संघटनेचं जनतेला आवाहन

आपण सर्वांनी घरी राहून कोरोनाशी लढा देऊयात, असं आवाहन या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आलं आहे. आपल्याला काही दिवसच घरात राहून अदृश्य शत्रूवर विजय मिळवायचा आहे. सर्वांच सहकार्य अपेक्षित आहे.

वृत्तपत्र जरी उपलब्ध नसलं तरी जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सर्व वृत्तपत्र हे ईपेपरच्या माध्यामातून राज्याकील घडामोडीचा आढावा घेता येणार आहे.

दरम्यान डब्बावाला संघटनेनेही डब्बा सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईवर किती मोठं संकट आलं तरीही डब्बा वाल्यांची आणि वृत्तपत्र संघटनेची सेवा ही खंड न पडता सुरु असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *