Thu. Dec 2nd, 2021

कोकणातही कोरोनाचा शिरकाव, ‘इथे’ आढळला रुग्ण

कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर आले आहे. याचा परिणाम अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. महाराष्ट्रातही आता कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच रत्नागिरीतील गुहागर येथे कोरोनाचा रूग्ण आढळला आहे.

दुबईहून 15 दिवसांपूर्वी एक 50 वर्षीय व्यक्ती गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मोहल्ला येथे आला. तो गावाला आल्यापासून त्याला साधा ताप, छातीत दुखणे आणि सर्दी झाली होती.

त्यानंतर बुधवारी संध्याकाळी शृंगारतळी मधील एका खाजगी दवाखान्यात हा रुग्ण उपचारासाठी गेला होता. तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्याला कोरोना असण्याची शक्यता सांगितली.

यानंतर तातडीने जिल्हा आरोग्य केंद्रात हा रुग्ण दाखल झाला. बुधवारी रात्री त्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

दरम्यान या रूग्णाच्या संपर्कात घरातील 7 जण होते. तसेच मागील 15 दिवसांपासून हा नागरिक खुलेआम फिरत होता. यामुळे कोरोनाचा किती पसार झाला आहे याचा तपास आरोग्य विभाग करीत आहे.

आता गुहागर मध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण मागील 15 दिवसात खूप साऱ्या मित्रपरिवारात हा रुग्ण संपर्कात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *