Jaimaharashtra news

पुण्यानंतर मुंबईत सापडले कोरोनाचे रुग्ण

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूने भारतातही प्रवेश केला. महाराष्ट्र सर्वात आधी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण सापडले. यानंतर कोरोनाने मुंबईकडे मोर्चा वळवला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचे २ रुग्ण coronavirus in mumbai आढळले आहेत. मुंबईत एकूण ६ संशयित रुग्ण होते. या ६ जणांपैकी २ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

या दोघांचे रक्ताचे नमुने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे. या दोघांवर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे.

गुरुवारी ११ मार्चला मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली.

महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण १० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या १० पैकी ८ जण हे पुण्यातील असून २ हे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, परंतु सतर्कता बाळगावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्र्यांनीही जनतेला आवाहन केलं आहे. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, विविध परिषदा, मेळावे, सभा यासारखे कार्यक्रम रद्द करावेत.

पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या समुहाने त्यांच्या परतीबाबत आरोग्य यंत्रणेशी संपर्कात राहण्याचे आव्हान उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले.

या कोरना व्हायरसमुळे राज्यातल्या पोल्ट्री व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकांना कोटींच्या घरात आर्थिक फटका बसला आहे.

‘चिकन 65’ बनवून लोकांना फुकटात वाटलं

कोरोनामुळे अनेक मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान कोरोनामुळे घाबरुन न जाता, प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करावी, असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version