महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २२० वर

महाराष्ट्रात कोरोनाचे १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. १७ पैकी ८ रुग्ण मुंबईमधील आहेत. पुण्यात ५ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. राज्यात सध्या १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३९ कोरोनाग्रस्तांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आलं आहे. दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तरीही मुंबईतील आणखी काही रुग्णांची तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांचं नाव यअद्याप या कोरोनाग्रस्तांच्या यादीत नाही. राज्यातल्या विविध रुग्णालयांत आद एकून ३२८ रुग्ण भरती झाले आहेत. तर विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४५३८ जणांना भरती केलं आहे. त्यातील ३८७६ जण कोरोना निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. २२० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.