धक्कादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६३वर

कोरोना विषाणू थांबण्याचं नाव घेत नाहीये. देशासह राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या शनिवारी दुपारपर्यंत ११ ने वाढली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण ५२ असलेली संख्या थेट ६३ वर पोहचली आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ झाली आहे. मुंबईत १० तर पुणे येथे १ अशा ११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या नव्या ११ रुग्णांपैकी ८ रुग्ण हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना कोरोना पादुर्भावामुळे लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी राज्यात ७ ठिकाणी लॅब कार्यरत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातील दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
#Corona : देशात 22 मार्चला जनता कर्फ्यूसह रेल्वेसेवा बंद राहणार
घरात बसून राहण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. बेस्ट बस, रेल्वेमधील संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र पूर्णपणे प्रवास करणं बंद झालेलं नाही.
…तर मला फोन करा, अमेय खोपकर यांचं आवाहन
त्यामुळे जर सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी कमी झाली नाही, तर नाईलाजाने रेल्वे आणि बस बंद करावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.