#Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जनतेशी साधणार संवाद

चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार झालाय. कोरोना विषाणू थांबवण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांशी संवाद साधणार आहेत. याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
वैश्विक महामारी कोरोना वायरसच्या पादुर्भाव संबंधात काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर संवाद साधणार आहे. नरेंद्र मोदी आज २४ मार्चला रात्री ८ वाजता संवाद साधतील.
याआधी काही दिवसांपूर्वी मोदींनी जनता कर्फ्युसाठी आवाहन केलं होतं. या आवाहनाला जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.
मात्र यानंतर दुसऱ्या दिवशी लोकं परत नेहमी प्रमाणे घराबाहेर पडले होते. त्यामुळे आज मोदी जनतेसोबत नक्की काय काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
दरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून संचारबंदी देखील लागू केली आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे हा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १०३वर गेला आहे. तर कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे.