Corona : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४२ वर

कोरोना विषाणू थांबण्याचं नाव घेत नाहीये. जगातील विविध देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातही कोरनाच्या रुग्णांचा आकडा १०० च्या पार गेला आहे.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४० च्या पार गेला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ४२ रुग्ण झाले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मंगळवारी मुंबईत मृत्यू झाला आहे.
यामुळे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा ३ इतका झाला आहे. राज्यातील जनतेने घाबरुन जाऊ नये. पण जागृक रहावे, असं आवाहन राज्य सरकारच्यावतीनं करण्यात आलं आहे.
कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता जीम, हॉटेल, शाळा-महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
अफवांवर विश्वास नको – आरोग्यमंत्री.
कोरनासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहे. कोरोनाची लागण झाली आहे की नाही ओळखण्यासाठी संबंधित रुग्णाची रक्त तपासणी केली जाते, या आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या तपासणीसाठी रक्त चाचणी होत नाही – आरोग्यमंत्री
या अशा अफवावंर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर शासनाच्या संबंधित विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.