Mon. Apr 19th, 2021

Corona : कोरोनाचा राज्यात तिसरा बळी, कोरोनाग्रस्तांचा आकडा 89

चीनवरुन आलेला कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोना थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनामुळे महाराष्ट्रात तिसरा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृतांचा आकडा हा आता 3वर जाऊन पोहचला आहे.

Image may contain: text

मुंबईमधील एका खासगी रूग्णालयामध्ये या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालाय. मृत झालेली व्यक्ती फिलिपिन्स येथून आली होती. कोरोना मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात नवे 15 रूग्ण सापडलेत. या 15 रुग्णांपैकी 14 रुग्ण हे मुंबईमधील तर पुण्यामधील 1 रुग्ण आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा 89 वर जाऊन पोहचला आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. परंतु या प्रयत्नांनतर देखील कोरोना थांबण्याच नाव घेत नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *