शनिवार ठरणार कोरोनाच्या लढाईतील महत्त्वाचा वार
देशभरात कोरोना लसीकरणाची चाचणी आज होणार आहे

देशभरात कोरोना लसीकरणाची चाचणी आज होणार आहे. त्यासाठी राज्यातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याचे प्रशिक्षण नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाची चाचणी होणार आहे.