Thu. Dec 2nd, 2021

Corona : संचारबंदी लागू करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांना विनंती

राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र असं असतानाही लोकं जमावबंदीच्या आदेशाचं पालन करत नाहीत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांन ट्विटद्वारे मुख्यमंत्र्याकडे विनंती केली आहे.

काय म्हणाले आव्हाड ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या कामाची प्रशंसा होतेय. पण काही काही जण गंभीर नाहीत. या ट्विटमध्ये आव्हाडांनी टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केले आहेत. या लोकांना संकंट किती भयंकर आहे, यातची कल्पना नाही, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

लॉक डाऊन करुन भागेल असं वाटत नाही, संचार बंदी लागू करा, असं आवाहन कमी विनंती आव्हाडांनी केली आहे.

परिस्थिती गंभीर आहे कोविड पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे. लोकं गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. त्यामुळे परिस्थिती चा विचार करता.

संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचं आव्हाड म्हणाले आहेत. आता नाही तर कधी नाही.

दरम्यान महाराष्ट्रात आजपासून (23 मार्चपासून ) 144 कलम लावण्यात आला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी नुकतचं एक ट्विट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या ट्विटद्वारे लोकांना विनंतीवजा आवाहन केलं आहे. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या.

स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *