कोरोनाचा पाकिस्तानातही धुमाकूळ

कोरोना व्हायरसमुळे जगावर संकट असल्यामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्वत्र कोरोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. मोठमोठ्या राष्ट्रांवर यामुळे संकट कोसळलं असताना लहान देशांना त्याहून जास्त त्रास होत आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
पाकिस्तानात आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आता पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या २७०८ एवढी झाली आहे. पंजाब प्रांतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारांच्या वर गेली आहे. तर मृतांची संख्या ४० पर्यंत आहे.
पाकिस्तान सरकार कोरोनाशी झुंज देत आहे. अनेक ठिकाणी जमावबंदी करण्यात आली आहे. तरीही अजून पाकिस्तानात लॉकडाऊन घोषित केलेला नाही. तरीही शाहीद आफ्रिदी सारख्या क्रिकेटपटूने लोकांसाठी मास्क वाटली आहेत. त्यांच्या खाण्याचा खर्चही आफ्रिदीने केला आहे. लॉकडाऊन हे पाकिस्तानला परवडणारं नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचा धोका आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानला कोरोनाशी लढण्यासाठी २०० मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. बांधकामक्षेत्रासाठी मोठी मदत पाकिस्तान शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.