Wed. Apr 14th, 2021

धुळ्यातील दोन तरूण अद्याप चीनमध्येच

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे तेथील भारतीय लोक आपल्या मायदेशी परतत आहेत. मात्र महाराष्ट्रातील धुळे येथील दोन तरूण या परिस्थितीत तिथेच अडकले आहेत.

चीन देशात अडकलेले धुळे जिल्ह्यातील दोन तरुण संशोधक हे तांत्रिक अडचणीमुळे भारतात परत येऊ शकले नाहीत. हे दोन्ही तरुण वुहान शहरात असून ते सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील पथारे या गावातील चंद्रदीप जाधव आणि धुळे शहरातील गिरीश पाटील हे दोन तरुण ‘बॅटरी’ या विषयातील संशोधनासाठी चीनमध्ये गेले आहेत. चीन सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या फेलोशिप अंतर्गत त्यांची निवड झालेली होती. नोव्हेंबर 2019 रोजी हे दोन्ही तरुण भारतातून चीनमध्ये गेले होते.

चीन या राज्यातील वुहान या शहरात ते वास्तव्याला आहेत. याच शहरातील वुहान विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत.

विशेष म्हणजे याच शहरांमधून कोरोना हा वायरस जगभरात पसरला. जीवघेणा कोरोना या व्हायरसचा प्रसार लक्षात घेता, भारत सरकारने चीनमधील आपल्या नागरिकांना भारतात आणले. मात्र अन्य भारतीयांप्रमाणे हे दोन्ही तरुण भारतात परतले नाहीत.

त्यांनी चीनमध्येच राहणं पसंत केलं. भारतात परत आल्यावर काही दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार, त्यानंतर परत चीनमध्ये उर्वरित शिक्षणासाठी परत जावे लागणार, यादरम्यान ज्या विद्यापीठात शिक्षण सुरू आहे, त्या विद्यापीठाची पूर्व परवानगी न घेता गेलो तर पुन्हा प्रवेश दिला जाणार की नाही ? शैक्षणिक नुकसान झाले तर ते भरून निघणार नाही, या भीतीपोटी हे तरुण भारतात आलेले नाहीत. 

भारत सरकारकडून जी परवानगी त्यांच्या विद्यापीठाकडून घेतली जायला पाहिजे होती ती परवानगी घेतली न गेल्यामुळे या तरुणांना भारतात येता आलेले नाही. मात्र हे दोन्ही तरुण चीनमधल्या वुहान शहरात सुरक्षित असल्याचं स्पष्ट झाल आहे.

आर्थिक अडचणींमुळे आपल्याला भारतात येता आलं नाही, अशा ज्या बातम्या आल्या आहेत त्या चुकीचं असल्याचं या तरुणांनी व्हिडिओतून स्पष्ट केलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *