Tue. Apr 20th, 2021

कोरोना व्हायरसमुळे मोबाईल उद्योग ‘हॅंग’

कोरोना विषाणूने गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये थैमान मांडलं आहे. या कोरोनामुळे चीनमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता या कोरोना व्हायरसचा फटका मोबाईल उद्योगाला बसला आहे.

या विषाणूमुळे महिन्याभरापासून चीनमधून मोबाईलचे स्पेअर पार्ट येणं बंद झालं आहे. कोरोना व्हायरसमुळे स्पेअप पार्ट येणं बंद झालं असल्याने मोबाईल पार्ट्सचे भाव वाढले आहेत.

भारतीय बनावटीच्या मोबाईलमध्ये चीनमध्ये बनणाऱ्या पार्ट्सचा वापर केला जातो. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे चीनमधील उद्योग बंद असल्याने त्याचा थेट फटका भारताला बसला आहे. 

मोबाईल्सच्या पार्ट्सची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती सद्या मोबाईल बाजारपेठेत आहे. त्यामुळे मोबाईलच्या पार्ट्सच्या किमतीत दरवाढ झाली आहे. तर काही वस्तूंचे भाव दुप्पट झाले आहेत.

पोल्ट्री उद्योगाला कोरोनाचा फटका

कोरोना व्हायरसचा फटका पोल्ट्री उद्योगालाही बसला आहे. खोट्या अपप्रचारामुळे पोल्ट्री उद्योगाला फटका बसला आहे.

बॉयलर कोंबडीच्या मांसापासून कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या चुकीच्या अफवांचा फटका  पोल्ट्री उद्योगाला बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *