Mon. Mar 8th, 2021

#Coronaeffect : राज्यातील अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

कोरोना विषाणू थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दररोज कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ३७ रुग्ण आहेत. तर देशात १०८ रुग्ण आहेत.

राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्णय घेतले जात आहे. तसेच कोरोनामुळे पोल्ट्री आणि पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आहे.

कोरोनाचा धसका साक्षात इंग्लंडच्या राणीनेही घेतला आहे.

दरम्यान राज्यात कुठे कुठे काय निर्णय घेण्यात आले आहेत, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

मुंबई

आर्थिक राजधानी मुंबईत जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत ३१ मार्चपर्यंत जमावबंदी असणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

बेस्ट बस- उपनगरीय रेल्वेमध्ये औषध फवारणी

महापालिकेतील बायोमेट्रिक थम्प बंद करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांसाठी संजय गांधी नॅशनल पार्क 31 मार्च पर्यंत बंद असणार आहे.

सांगलीमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द

सांगलीच्या लाल परीला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल 432 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

गेल्या 2 दिवसात तब्बल 22 लाखाचे नुकसान एस टी महामंडळाचं झालं आहे. शिवशाही फेऱ्या अर्धा तासावरून 1 तासांवर सोडण्यात येत आहेत. प्रवासी संख्या कमी झाल्याने हा निर्णय एस टी महामंडळाने घेतला आहे.

यामध्ये आणखी आकडा वाढण्याची संख्या आहे. अशी माहिती सांगली विभाग नियंत्रक यांनी सांगितले.

कोल्हापूर

कोल्हापुरमध्ये कोरोनाच्या राधानगरी अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राधानगरी अभयारण्य 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय औरंगाबाद मध्ये एक कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने सिद्धार्थ उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूमुळे MPSC च्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित

अमरावती

कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकला, अशी मागणी अमरावतीतील नागरिकांच्या वतीने केली आहे.

पंढरपूर

पंढरपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अन्नछत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारपासून फूड पॅकेटमधून प्रसाद मिळणार आहे. या प्रसादाचा दररोज हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेतात. कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांची माहिती दिली आहे..

कराड

कराडमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी उभारली आहे. या मानवी साखळीद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.

कराड तालुक्यातील उंडाळे येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी उभारली आहे. कोरोना विषाणू विषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी सामाजिक संदेश देत मानवी साखळी उभारली आणि गो कोरोनाचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *