Sat. Feb 27th, 2021

Corona : आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला किरीट सोमय्यांनी दिला प्रतिसाद

जगावर कोरोनाच्या निमित्ताने संकट ओढावलं आहे. त्यामुळे कोरोनामुळे सर्व जगासमोर संकट आवासून उभं आहे. या कोरोनाविरुद्ध संपूर्ण जग सामोरं जात आहे.

राज्यातील कोरोनाच रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. तसेच कोरोनामुळे रक्तसाठा कमी पडू नये यासाठी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं.

राज्यात रक्ताचा तुटवड्याचा धोका, रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

राजेश टोपेंच्या या आवाहनाला भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिसाद दिला आहे. किरीट सोमय्या यांनी रक्तदान करत आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. किरीट सोमय्या यांनी रक्तदान करतानाचा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकद्वारे शेअर केला आहे.

किरीट सोमय्या यांनी घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालयात रक्तदान केलं आहे. सर्वोदय रुग्णालय हे घाटकोपरमधील मोठं हॉस्पीटल आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मंगळवारी दुपारपर्यंत १०१ इतका होता. तर ४ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसोबत संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *