यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे 22 रुग्ण बरे तर 34 जण नव्याने पॉझेटिव्ह
यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात 34 जण नव्याने पॉझेटिव्ह…

यवतमाळ : महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहे तर काही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा वाढताच वाढत आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातची स्थिती सुद्धा वाईट आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 22 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात 24 तासात 34 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 344 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 34 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 310 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात सध्या 362 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 89 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10169 झाली आहे.
आज 22 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9067 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 90979 नमुने पाठविले असून यापैकी 90654 प्राप्त तर 325 अप्राप्त आहेत. तसेच 80485 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.