Wed. Mar 3rd, 2021

#Coronavirus च्या सावटाखाली हसन मुश्रीफ यांचा जनता दरबार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल मधील घरातील दररोजचा जनता दरबार म्हणजे किमान हजारावर माणसांची उपस्थिती ठरलेलीच, पण गेल्या दोन दिवसापासून कोरोना संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी तोंडाला मास्क लावून जनता आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुरू ठेवला. तसेच कार्यकर्त्या भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी मास्क लावण्याबरोबरच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे ही धडे दिले.

एरव्ही घरातीलच हॉलमध्ये मुश्रीफांचा जनता दरबार भरलेला असतो. पण गेल्या आठवडाभर सर्वत्र वाढत चाललेल्या संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावर नामी इलाज शोधला. घरासमोरच्या रिकाम्या जागेत त्यांनी भव्य शामियाना उभारला.

यावेळी कार्यकर्त्यांची बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संपूर्ण जगासह भारतातीलही कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत आहे. या रोगाला न घाबरता, न डगमगता सावधगिरी बाळगूया तसेच वैयक्तिकरित्या खबरदारी घेत या महामारीशी हिंमतीने मिळून लढू या, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *