#Coronavirus : नाशिकमधील काळाराम मंदिर बंद, पूजा मात्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिक मधील ऐतिहासिक काळाराम मंदिर देखील आजपासून 31 मार्च पर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. तसंच यापूर्वीच रामनवमी उत्सवातील देखील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेत फक्त मंदिरातील होणारे पूजा आणि विधी सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली होती.

सोमवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व धार्मिक स्थळं जर बंद ठेवण्यात येत असतील तर ते करण्यात यावं, असं आवाहन केलं होतं. याच आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे. कित्येक वर्षानंतर ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली.
दरम्यान 31 मार्च पर्यंत मंदिर बंद राहणार असले तरी याकाळात देवाची पूजा आणि विधी सुरू राहणार असल्याची माहिती मंदिरातील शंकर पुजारी यांनी दिली.