#Coronavirus : चक्क बाप्पालाही मास्क!

एकीकडे कोरोनाच्या भीतीने मंदिरात भाविकांनी गर्दी करून नये, अशी सूचना देण्यात येत आहे. तर नाशिकच्या रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात चक्क बाप्पाला मास्क घातलं आहे. याद्वारे त्यांनी कोरोनासंदर्भात जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाने घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिककारांचे श्रद्धास्थान म्हणून रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिराची ओळख आहे. अनेक गणेश भक्तांच्या कामाची सुरुवात ही गणेशाच्या दर्शनाने होत असते.
सध्या corona virus थैमान घातलं आहे. हा विषाणु निघून जावा म्हणून मंदिर प्रशासनाने बाप्पाला साकडं घातलंय. तसंच गणपती बाप्पाला मास्कही घातलंय. या माध्यमातून नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी आणि कोरोना व्हायरसला घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.