Wed. Dec 1st, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

यवतमाळ, दि. 6 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 74 जण कोरोनामुक्त झाले असून 46 जण पॉझेटिव्ह आले तसेच आज एका व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सदर मृत्यू खाजगी रुग्णालयात झाला आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रवीवारी एकूण 3648 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 46 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3602 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 817 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 359 तर गृह विलगीकरणात 458 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72392 झाली आहे. 24 तासात 74 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69796 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1779 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 48 हजार 254 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 74 हजार 587 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.17 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.26 आहे तर मृत्युदर 2.46 आहे. पॉझेटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 35 पुरुष आणि 11 महिला आहेत. यात दारव्हा येथील 2, कळंब 1, महागाव येथील 6, नेर येथील 8, पांढरकवडा 2, पुसद येथील 3, राळेगाव 1, उमरखेड 1, वणी येथील 9, यवतमाळ 7 तर झरीजामणी येथील 4 तर इतर जिल्ह्यातील 2 रुग्ण आहे. आज मृत्यू झालेल्यामध्ये दारव्हा तालुक्यातील 32 वर्षीय पुरूषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2063 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 216 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2063 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 76 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 501 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 73 रुग्णांसाठी उपयोगात तर 453 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 67 उपयोगात तर 1109 बेड शिल्लक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *