नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू
फायझरची लस घेतल्यानंतर नागरिकांना त्रास…

कोरोनाचा हाहाकार हा जगात सुरू आहे. त्यानंतर लस मिळाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्याला परिस्थिती काही वेगळाच खेळ खेळतांना दिसत आहे. नॉर्वेमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नॉर्वेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. डिसेंबर २७ पासून नॉर्वेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचं समोर आलं आहे. यात शनिवारी २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे नॉर्वे सरकारसमोर नव्या संकट उभं ठाकलं आहे.
मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश मृत्यू हे गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे झाले आहेत. लस घेतल्यानंतर या नागरिकांना उलटी, ताप यासारखा त्रास जाणवला होता. नॉर्वेमध्ये फायझर बायोएनटेक तयार केलेली लसच उपलब्ध झालेली आहे. लसीकरणानंतर झालेले मृत्यू या लसीशी संबंधितच आहे. १३ जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली असून, उर्वरित १६ जणांच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे, असं नॉर्वे मेडिसीन यंत्रणेनं ब्लूमबर्गला माहिती देताना म्हटलं आहे.