Fri. Dec 3rd, 2021

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर, परभणी आणि लातूर

 

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे.

201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विदर्भातील वाढलेल्या तापमानामुळे मतदानाची वेळ 1 तासाने वाढवण्यात आली आहे.

 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या तिन्ही महापालिकांमध्ये सकाळी 7.30 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत मतदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *