पंतप्रधान मोदींच कोरोना लसीसाठी मोठं विधान
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या
माध्यमातून पंतप्रधान मोदींच कोरोना लसीसाठी मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भात सोमवारी एका मोठे विधान केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करताना दुर्लक्ष करु नका असे आवाहनही केलं.
पंतप्रधान मोदी हे आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी देशाला आता जास्त काळा वाट पाहण्याची आवश्यकता नाही असं विधान मोदी यांनी केलं. “संसर्ग रोखण्यासाठी आपल्याबाजूने दुर्लक्ष करुन चालणार नाही. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे” असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.“मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लसीकडे लागले आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबण्याची आवश्यकता नाही” असं मोदी यांनी म्हटलं.