अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी त्यांच्या वकीलाकडून उच्च न्यायालयात धाव…

Indian television news anchor Arnab Goswami sits inside a police vehicle after he was produced in a court following his arrest in Mumbai, India, Wednesday, Nov. 4, 2020. Indian police on Wednesday said they arrested the Republic TV founder and charged him with abetment to suicide in connection with the 2018 deaths of an interior designer and the designer's mother. (AP Photo)
रिपब्लिक मी़डीयाचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी त्यांच्या घरातून अटक करण्यात आले होते. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला जबाबदार या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
अटक केल्यानंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले होते. अलिबाग न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी त्यांच्या वकीलाकडून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या अर्जावर आज सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते किरीट सोमया यांनी ट्विट करून म्हटलयं, अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली, अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन सुनावण्यात आली आहे. याबद्दल मुंबई हायकोर्टात दाद मागितली जाईल तसेच अर्णब गोस्वामी यांना नक्की न्याय मिळेल असं त्यांनी स्पष्ट केल आहे.
दरम्यान या प्रकरणातील अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे जामिनासाठी काय हालचाली करण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.