Tue. Sep 28th, 2021

सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था, बडगाम

 

सीआरपीएफच्या जवानांना लाथा-बुक्क्या मारणाऱ्या नराधमांची ओळख पटली आहे. ज्या काश्मिरी तरुणांनी बंदूकधारी जवानांवर हात उचलले, त्यांना जेरबंद करण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. 

 

जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण हे बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हासुद्धा दाखल केला आहे. 

 

काश्मीरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीवेळी सीआरपीएफ जवान मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशिन घेऊन परतत असताना, स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी नागरिकांनी सीआरपीएफ जवानांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली होती. 

 

9 एप्रिलला श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांची तळपायाची आग मस्तकात गेली. विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *