Thu. Jan 20th, 2022

भारताच्या हरलीन देओलचा सुपर कॅच!

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला या सामन्यात जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी संघाच्या क्षेत्ररक्षणामुळे मात्र खेळाडूंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हरलीन देओलने घेतलेल्या भन्नाट कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शिखा पांड्येच्या गोलंदाजीवर अ‍ॅमी एलेन जोन्सननं जोरदार फटका मारला. हा चेंडू सीमापार जाणार असं वाटत असतानाच हरलीन देओलने चपळाईने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजरा दाखवत चेंडू झेलला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा हरलीनचं कौतुक केलं आहे. ‘हा जबरदस्त कॅच आहे. हा माझ्यासाठी कॅच ऑफ द ईअर आहे’, असं सचिनने म्हटले आहे.

हरलीनच्या या कॅचमुळे एमी एलन जोन्सला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. महिला क्रिकेटमधील आजवरचा हा सर्वोत्तम कॅच मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *