Sun. Mar 7th, 2021

महिलांना अश्लील कॉल करणारा अटकेत

महिलांना फोन करुन त्याच्याशी अश्लील बोलणारा तसेच मॅसेज करुन त्याना त्रास देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.  अत्यंत चालाखीने हे दुष्कृत्य करणाऱ्या या व्यक्तीला तितक्याच हुशारीने पकडण्यात आलं.

सायरनच्या आवाजामुळे पकडला गेला आरोपी

संतोष देवासी असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नेरुळ सेक्टर 20 चा राहणारा आहे.

त्याच्यावर वाशी NRI आणि रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संतोष हा वेगवेगळ्या महिलाचा नंबर मिळवून निनावी कॉल करत असे आणि अश्लील संभाषण करत असे.

तसेच त्यांना घाणेरड्या प्रकारचे मॅसेजही करत होता. तो नवीन नंबरसाठी नवनवीन सिम कार्डचा वापर करत होता.

त्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

मात्र वाशीमधील महिलेला फोन करून अश्लील बोलू लागला, तेव्हा त्याच्या आसापास सायरनचा आवाज येत होता.

ही गोष्ट महिलेने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला. तांत्रिक तपासातून संतोषची माहिती मिळाली.

चौकशी दरम्यान असे समजले की, तो नेरुळच्या अपोलो या रुग्णलयात काम करत होता.

महिला कर्मचाऱ्याचे नंबर मिळवायचा आणि त्यांना वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल करून त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असे.

पोलिसांनी त्याचे सर्व सिम कार्ड जप्त केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *