दारू पिऊन आल्यावर दार न उघडल्यानं मुलाने केली वडिलांची हत्या
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापुरात मुलानं वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलानं वडिलांना चाकूनं भोसकलं.
विक्रमनगरातल्या शाहू कॉलनीत ही घटना घडली. रफिक मुल्ला असं आरोपी मुलाचं नाव आहे.
रफिक दारू पिऊन आला होता. त्यामुळे त्याचे वडील पिरसाब मुल्ला यांनी दार उघडलं नाही.
याच रागात रफिकनं त्यांना चाकूनं भोसकलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.