Thu. Jul 2nd, 2020

नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करा – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांबद्दल महत्तावाचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची माहिता वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यालयाने दिले आहेत.

वेबसाईटसह राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती स्थानिक, राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये आणि फेसबुकवरही माहिती प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता जनतेला नेत्यांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळणार आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं पालन न करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *