महाराष्ट्रात संचारबंदी लागू, उद्धव ठाकरे यांचे आदेश

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढल्यामुळे जमावबंदीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘महाराष्ट्र कोरोनाच्या उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे नियम काटेकोरपणे पाळा’ असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. ही भीती लक्षात घेऊनच संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. जीवनावश्यक वस्तू तसंच अन्नधान्य आणि इतर अत्यावश्यक सेवाही सुरू राहणार आहेत. सर्व प्रार्थनास्थळं बंद असतील. धर्मगुरू आणि पुजाऱ्यांना पूजा करण्याची अनुमती असेल. मात्र प्रार्थनास्थळ सामान्यांसाठी बंद असतील.
विदेशातून आलेल्या प्रत्येकाने स्वतःला विलग ठेवणं आवश्यक आहे. टॅक्सीत दोन व्यक्ती तर रिक्षात एकच प्रवासी आता प्रवास करू शकतील. सर्व वाहनांना वाहतूक बंद असेल. नाईलाजाने ही संचारबंदी लागू करावी लागत आहे.